स्वतःचं आत्मपरीक्षण करताना व त्यातून स्वतःच्या actions ला, emotions ला आकार देताना आपल्याला Happiness ची base line कशी मिळवावी याची दिशा मिळायला लागते. यातून स्वतः चं processing करताना आपण Self Awareness Zone(SAZ) च्या जवळ जावं यासाठीचा आपला अट्टहास किती प्रखरतेने काम करतो यावर आपली Happiness ची Baseline किती strong आहे हे ठरत असावं. त्यासाठी आपण त्या process चा भाग असणं गरजेचं आहे.
तर ही Baseline म्हणजे नेमकं काय..... तर तुमचं Happy असणं कुठल्याही परिस्थितीवर अवलंबून नसणं. म्हणजेच एखादी गोष्ट मिळाल्यावरच मी आनंदी होईल असा अट्टहास असणे. पण या अट्टहासाला desire ची किनार असल्याने ते तितकसं शाश्वत असत नाही. उलट process चा आनंद घेता आला पाहिजे. पण त्या process च्या आनंदाच्या comfort zone मध्ये अडकून चालणार नाही. नाहीतर process ला 0 to 1 आपण नेऊच शकणार नाही. म्हणूनच Proceess execution आणि rectification या दोन्ही मधला आनंद आपण सतत explore केला पाहिजे. हे करत असताना येणारे challenges handle करताना आपली Baseline happy असली कि कार्य सिद्धीस लागतं. हे खूप आव्हानात्मक आहे पण ते करण्याचं skill आपण अवगत करायलाच पाहिजे. कारण अंधाऱ्या रात्रीत चमकणाऱ्या काजव्यापेक्षा अधिक जास्त अस्तित्व आपलं नसतं. पण त्या तशा चमकण्याने आजूबाजूला एक सकारात्मक प्रभाव नेहमीच निर्माण होत असतो. त्या थोड्या वेळा पुरतं का होईना पण चमकण्यासाठी ती baseline happy ठेवण्याचा आपला अट्टहास असावा.
म्हणूनच आपण प्रयत्नशील असावं की प्रेम , करुणा, सहभावना , साहस हे भाव सतत मनात रुळावेत तरच आपल्यात एक आंतरिक बळ व ऊर्जा निर्माण व्हायला लागते. त्यातूनच मग आपली Baseline Happinees Zone च्या अवतीभोवती फिरत असावी.
मग त्याला पूरक म्हणून तुमचं network push factor असावा त्या प्रमाणे कामात येतं. पण तेच सर्वस्वी नसून महत्वाचं असं पुरक साधन असतं हेही आपल्या लक्षात असावं. त्या network मधील एखादी फांदी तुटली की एखादी दुसरी फांदी ती पुरकता भरून काढते हे मात्र नक्की. ह्या फांद्या म्हणजे नेमकं काय...? तर तुमचं कुटुंब,तुमचा मित्र परिवार, तुमचं healthy network इ. या सोबतच आतापर्यंत तुम्ही कमावलेले अनुभव , त्यातून घडलेला तुमचा संचित स्वभाव , तुमचा skill set , तुमच्या भविष्यातील aspirations मधून तुम्हाला मिळत गेलेला आनंद - feel good factor हया सर्व फांद्या तुमच्या आत वसलेल्या असतात. यांपैकी बाहेरील फांद्यांच संतुलन imbalance व्हायला लागलं की आतील फांद्या lead करतात.
पण त्यावेळेस ते cosnicously जमण्यासाठी तुमची baseline happy असावी. आणि ही baseline strong असण्यासाठी स्वतःच्या विचारांवर, actions वर, emotions वर सतत healthy food चा वर्षाव करत राहावं. त्या बद्दल awareneess वाढवावा. आणि त्यासाठी सतत focus oriented आणि वाढून ठेवलेल्या कामाप्रती वास्तविक भान ठेऊन झटत राहावं.
कदाचित happiness ची baseline strong व शाश्वत करण्याचा हाच प्रवास असावा.
© शुभम